समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली – आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाचे  (एसपी) नेते आझम खान यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत आझम खान यांना ४८ तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी सहा वाजल्यापासून निर्बंधित कालावधीसाठी रोड शो किंवा मुलाखत देण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

दरम्यान, आझम खान यांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करत, एका विशिष्ट समाजाची मते मिळू नयेत म्हणून त्यांना मतदान करण्यास जाऊ नये यासाठी धमकावले जाते, असा आरोप केला होता. आझम खान यांचे वक्तव्य आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे मानून प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी, आझम खान यांच्या विरोधात जयाप्रदा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)