एकताच्या बाळाचे नामकरण स्मृती मावशीच्या हस्ते

सिरीयल वर्ल्डची अनभिषिक्‍त सम्राज्ञी एकता कपूर नुकतीच सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. आपल्या तान्हुल्या बाळाच्या नामकरणासाठी तिने एक समारंभ आयोजित केला होता. सर्वसाधारणपणे बाळाचे नाव बाळाची आत्या ठेवते. पण एकताच्या बाळाची मावशी म्हणजे स्मृती इराणीनी या बाळाचे नामकरण केले.

एकताने या समारंभाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि त्याला कॅप्शन दिली आहे, “मांसी स्पेशल’ या कॅप्शनला स्मृती इराणींनीही मस्त कॉमेंट दिली आहे. “मावशीकडून खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून भरपूर प्रेमही. लहान बाळाला मांडीवर घेऊन तू जेंव्हा पूजेला बसशील तेंव्हा तुझ्यावर आनंद, हास्य आणि देवाच्या आशीर्वादांची बरसातच होऊ दे.’असे त्यांनी म्हटले आहे.

“क्‍यों की सांस भी कभी बहू थी’पासून एकता आणि स्मृती दोघींची पक्की मैत्री झाली आहे. भारतातील सर्वात गाजलेल्या आणि सर्वाधिक काळ चाललेल्या सिरीयलपैकी एक “क्‍यों की सांस भी..’ ही सिरीयल होती. एकता कपूरने सिरीयलच्या निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकल्यापासून तिच्या अन्य कोणत्याही सिरीयलला या सिरीयलइतके यश मिळालेले नव्हते. सिरीयल संपून आता दशकभराचा काळ उलटला तरी या दोघी सख्ख्या भगिनींसारख्या घट्ट मैत्रीत आहेत. केंद्रीय मंत्री झाल्यानंतरही स्मृती इराणींनी आपल्या या मैत्रिणीच्या आयुष्यातील मोलाच्या क्षणी उपस्थित राहण्यासाठी वेळ राखून ठेवला, यात कोणतेच आश्‍चर्य वाटायला नको. या नात्याचा आधार घेऊन स्मृती इराणींनी एकताच्या बाळाचे नाव “रावी’ असे ठेवले आहे.

“क्‍योंकी..’मध्ये संधी दिल्याबद्दल गेल्या वर्षी स्मृती इराणींनी एका भावनिक पोस्टद्वारे एकता कपूर आणि तिच्या आईचे आभार मानले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)