गणेश जयंतीनिमित्त एकता गणेशोत्सव मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

पुणे – सिंहगड रोड येथील आनंद नगर मधील, एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत यंदाचा गणेश जन्म सोहळा एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला. हिंगणे खुर्द येथील निवासी मतिमंद विद्यालयास आर्थिक व धान्यदान स्वरुपातील मदतीचा हात पुढे केला.

मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी.गाडेकर यांना विद्यार्थ्यांसाठी मंडळाचे अध्यक्ष विक्रम वाघ यांच्या हस्ते ५००१ चा निधी सुपूर्त केला. याप्रसंगी मंडळाचे आप्पा ठणके, अॅड.विशाल पोकळे, किरण राऊत, राजेंद्र मारणे, किशोर मंडावले, दिलीप मंडावले, मुकुंद नारखेडकर, मोहन जोंधळे, रामदास पिंगळे, परमेश्वर राजगिरे, अजय हंचाटे, कडवाडकर, मोहन शेटे, उत्तम शेलार, गजानन बारभाई उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पंडित यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)