आईनस्टाईनच्या त्या पत्राला मिळाले 2.89 दशलक्ष डॉलर्स

न्युयॉर्क: ईश्‍वर आणि धर्म या विषयाचा उल्लेख असलेल्या अल्बर्ट आईनस्टाईनच्या पत्राला येथील लिलावात 2.89 दशलक्ष डॉलर्सचा भाव मिळाला आहे. हे दोन पानी पत्र आईनस्टाईन यांनी 3 जानेवारी 1954 रोजी जर्मन फिलॉसॉफर पी. एरिक यांना लिहीले आहे. एरिक यांनी बायबलवर एक पुस्तक लिहीले असून त्या पुस्तकाची प्रत त्यांनी आईनस्टाईन यांना पाठवली होती.त्यावर त्यांना पाठवलेल्या पत्रात आईनस्टाईन यांनी म्हटले आहे की माझ्यासाठी ईश्‍वर हा शब्द मानवी कमजोरीचा आविष्कार दर्शवणारा शब्द आहे.

आईनस्टाईन यांनी आपल्या मृत्युच्या एक वर्ष आधी हे पत्र लिहीले असून त्यात त्यांनी ईश्‍वर आणि धर्म या विषयावर आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. सतराव्या शतकातील ज्यु तत्वज्ञ बारूच स्पीनोझा यांनी मांडलेले तत्वज्ञान त्यांना अधिक महत्वाचे वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. धर्म ही संकल्पना म्हणजे अदिम अंधविश्‍वासाचा अविष्कार आहे असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

-Ads-

आपण स्वत: ज्यु धर्मिय आहोत पण आपण अन्य लोकांपेक्षा स्वत:ला फार वेगळे किंवा फार महत्वाचे समजत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. मानवतेच्या लाभासाठी स्वार्थनिरपेक्ष नैतिक पायाभरणी लोकांमध्ये असणे मला अधिक महत्वाचे वाटते. त्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माची गरज नसल्याचेच त्यांचे म्हणणे होते असे या पत्रातून अधोरेखीत झाले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)