स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात, मुंबई कस्टम्स अंतिम फेरीत

आठवी हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धा

पुणे – स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात आणि मुंबई कस्टम्स संघांनी आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. नेहरुनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी गुजरात संघाने इन्कमटॅक्‍स संघाचा 3-3 अशा बरेबरीनंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये 3-2 असा पराभव केला. मुंबई कस्टम्स संघाने मुंबई रिपब्लिकन संघाचा 2-1 असा पराभव केला. अंतिम सामना उद्या रविवारी रंगणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेगवान झालेल्या सामन्यात मुंबई कस्टम्स संघाने बी. मुथाना याने केलेल्या गोलमुळे विजयावर शिक्कामोर्तब केले.त्यापूर्वी ऍल्डन डीसूझाने नवव्या मिनिटाला कस्टम्स संघाला आघाडीवर नेले होते. सामन्याच्या उत्तरार्धात प्रणित नाईकने कस्टम्स संघाच्या गोलरक्षक रवी राजपूत याच्या पॅडला लागून परत आलेल्या चेंडूवर 44व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली होती.

पहिल्या सामन्यात गुजरात आणि इन्कमटॅक्‍स संघांत नियोजित वेळेत 3-3 अशी बरोबरी राहिली. इन्कमटॅक्‍स संघाच्या प्रदीप मोर याने अखेरच्या मिनिटाला कॉर्नरवर गोल करून सामना टायब्रेकमध्ये नेला होता. नियोजित वेळेत सामन्याच्या नवव्या मिनिटाला नितिनकुमार याने इन्कमटॅक्‍स संघाचे खाते उघडले होते. त्यानंतर आकाश शेलार याने गुजरात संघाला बरोबरी साधून दिली. यामुळे मध्यंतराला सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता.

उत्तरार्धात विक्रमसिंग याने 38व्या मिनिटला इनम्कमटॅक्‍स संघाला आघाडीवर नेले. चारच मिनिटांनी वैभव शहा याने गुजरात संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर खेळाचा वेग वाढवून गुजरात संघाने आपले वर्चस्व राखले होते. सामन्याच्या 55व्या मिनिटाला आकाश शेलार याने गुजरात संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, अखेरच्या क्षणी प्रदीपने गोल करून सामना टायब्रेकमध्ये नेला. यात इन्कमटॅक्‍स संघाच्या प्रदीप मोर याने पहिली संधी व्यर्थ दवडली. त्यानंतर गुजरात संघाच्या सचिन पटेल याने गोल करून आघाडी घेतली. दुससी संध सुरज शाही याने इन्कमटॅक्‍स संघासाठी अचूक साधली.

गुजरातच्या शाम यादवला मात्र अपयश झाल्याने 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरी संधी इन्कमटॅक्‍सच्या पवन सैनी, गुजरातच्या आकाश शेलार यांना साधता आली नाही. चौथी संधी इन्कमटॅक्‍स संघाला साधता आली नाही. या वेळी दिलीप पाल याला चुकीच्या पद्धतीने अडवल्यामुळे पंचांनी इन्कमटॅक्‍स संघाला पेनल्टी स्ट्रोक दिला. मात्र, पवनला या वेळीही अपयश आले. गुजरात संघाच्या वैभव शहाने गोल करून संघाचा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या संधीला इन्कमटॅक्‍सच्या विक्रम सिंग आणि गुजरातसाठी साहिल कटियार यांनी गोल केला. मात्र, तीन संधी गमाविल्यामुळे इन्कमटॅक्‍सला लढत गमवावी लागली.

सविस्तर निकाल – उपांत्य फेरी –

1) स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात 3 (आकाश शेलार 20, 55, वैभव शहा 42, रुचित पटेल, वैभव शहा, साहिल कटियार) वि.वि. इन्कमटॅक्‍स 3, 2( नितिन कुमार 9, विक्रम सिंग 38, प्रदीप मोर 60 वे मिनिट, सुरज शाही, विक्रम सिंग).

2) मुंबई कस्टम्स 2 (ऍल्डन डीसूझा 9, मुथाना 50वे मिनिट) वि.वि. मुंबई रिपब्लिकन्स 1 (प्रणित नाईक 44 वे मिनिट) मध्यंतर 1-0.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)