आयफेल टॉवरचा 130 वा वाढदिवस

पॅरिस – जगप्रसिद्ध आयफेल टॉवरचा 130 वा वाढदिवस आज पॅरिसमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयफेल टॉवरवर नयनरम्य “लाईट शो’ आयोजित करण्यात आला होता. 1889 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या “वर्ल्ड फेअर’च्या निमित्ताने आयफेल टॉवरची उभारणी करण्यात आली होती. हा वर्ल्ड फेअर संपल्यावर लगेचच हा मनोरा पाडून टाकण्याची मागणी मूळ धरायला लागली होते. मात्र या मनोऱ्यामुळे पॅरिसच्या सौंदर्यात भर पडली असल्याचे आणि हा टॉवर पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनल्याचे लक्षात आले.

तब्बल 324 मीटर उंच असलेल्या आणि 7,300 टन वजनाच्या या जगप्रसिद्ध मनोऱ्याला पाहण्यासाठी दरवर्षी 70 लाख पर्यटक देशा-परदेशातून येत असतात. हा टॉवर म्हणजे 1930 पर्यंत जगातील सर्वात उंच बांधकाम केलेली इमारत होता. आयफेल टॉवर पेक्षा उंच ख्रिसलर बिल्डींग 1930 साली न्यूयॉर्कमध्ये उभारण्यात आली. गेल्या वर्षी आयफेल टॉवरच्या पायऱ्यांचा काही भाग तब्बल 1 लाख 70 हजार युरोना विकण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)