इजिप्तच्या जगप्रसिद्ध पिरॅमिड स्थळानजीक बॉम्बस्फोट

तीन विदेशी पर्यटक आणि स्थानिक गाईड ठार

गिझा: इजिप्तमधील जगप्रसिद्ध पिरॅमिड स्थळानजीक ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात एकूण चार जण ठार झाले. मृतांमध्ये तीन विदेशी पर्यटक आणि एका स्थानिक गाईडचा समावेश आहे. ठार झालेले पर्यटक व्हिएतनामचे रहिवासी आहेत. हा बॉम्ब गावठी स्वरूपाच होता. यामध्ये व्हिएतनामचे अन्य 11 पर्यटकही जखमी झाले असून जखमींमध्ये स्थानिक बसचालकाचाही समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गिझा पिरॅमिड स्थळाजवळील एका सीमाभिंतीनजिक हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. व्हिएतनामी पर्यटकांना घेऊन येणारी बस त्या ठिकाणी येताच, बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला. या घटनेचे वृत्त समजताच पंतप्रधान मुस्तफा मदबौली यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि त्यांनी जखमींचीही रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना इजिप्तच्या पंतप्रधानांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्‍त करतानाच जगातील कोणताही देश आता शंभर टक्के सुरक्षेची ग्वाही देऊ शकत नाही, असे म्हटले आहे. या घटनेला फार मोठे महत्त्व देऊ नये, असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमाना केले. त्यामुळे त्यांच्या या आवाहनाविषयी आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)