इजिप्तमध्ये लष्कराच्या धडक कारवाईत 52 दहशतवादी ठार 

कैरो (इजिप्त): इजिप्तमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या एका विशेष धडक कारवाईत 52 दहशतवादी ठार झाले आहेत. उत्तर आणि मध्य सिनाई प्रांतात करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईत दहशतवाद्यांचे 7 अड्डे नष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कारवाईत मारलेल्या 26 दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्वयंचकित रायफल्स, हातबॉंब, दारूगोळा आणि वायरलेस संपर्क साधने ताब्यात घेण्यात आली आहेत. 

दुसरी कारवाई उत्तर सिनाई प्रांताची राजधानी अरिश येथे करण्यात आली. पोलीसांनी केलेल्या या कारवाईत बाकी दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून 10 स्वयंचलित रायफल्स, चार मशीनगन्स, दोन स्फोटक उपकरणे जप्त करण्यात आली. या कारवायांत मिळून 26 वाहने आणि लायसन्स नसलेल्या 52 मोटरबाईक नष्ट करण्यात आल्या. 

-Ads-

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इजिप्त सरकारने सिनाई 2018 मोहीम सुरू केली आहे. त्यात आतापर्यंत 380 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. आणि या चकमकींमध्ये 30 पेक्षा अधिक सुरक्षा कर्मी मारले गेले आहेत. 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)