अंडी हा उत्तम आहाराच.! (भाग 2)

अंडी हा उत्तम आहाराच.! (भाग 1)

-डाॅ. त्रिशला चोप्रा

अंडी हा अन्नघटक बऱ्याचदा विश्‍वसनीय, पौष्टिक, स्वस्त आणि पोषक आहाराच्या स्वरूपात आपण उपयोगात आणू शकतो. बऱ्याच संस्कृतींमध्ये आणि धर्मांमध्ये, अंडी जीवनाचा आणि पुनर्जन्माचा प्रतीक आहेत. या शतकामध्ये, पोषणाची आपली समज सुधारल्याने अंडी आपल्या आहारात बऱ्याच जणांनी समाविष्ट केल्याचे आढळून येते. खरं तर, एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की दिवसातून एक अंड खाल्याने स्ट्रोक आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. संशोधनातून दिसून आले आहे की एका गटातील लोकांनी दररोज अंडी आहारात समावेश केल्याने त्यांचा हृदयविकाराचा धोका कमी झाला!

-Ads-

एचडीएल चांगले मानले जाते कारण ते जास्त कोलेस्टेरॉल यकृताकडे हस्तांतरित करते, जिथे ते आपल्या धमन्यांशी चिकटण्याऐवजी शरीरातून बाहेर काढले जाते. एलडीएल कोलेस्टेरॉलला आपल्या धमन्यांमध्ये पोचवते ज्याने संभाव्य रक्त गाठ होऊ शकते (आणि त्याद्वारे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याची शक्‍यता बळावते).

अंडी एलडीएल आणि एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कशी प्रभावित करतात?

मला विविध विषयांवर अभ्यास करायला आवडते त्यामुळे मी लेख लिहिताना बरेच संशोधन करून ते लिहीत असते! एक अभ्यास होता, ज्यात असे आढळून आले की, जे लोक एका महिन्यात दिवसाला तीन अंडी खात होते, त्यांची दोन प्रकारच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीमध्ये कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही, याचा अर्थ हृदयाच्या आरोग्यास कुठल्याही प्रकारची जोखीम नाही. अंडी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे फार चांगले स्त्रोत आहेत, ज्यापैकी काही आयोडीन आणि व्हिटॅमिन डी जे इतर खाद्य पदार्थांमध्ये सापडणे कठीण आहे. ते पोषक व प्रथिनेचे वास्तविक ऊर्जागृह आहेत.

इतर पोषक घटकांमधील कुठले घटक एका मध्यम आकाराच्या अंड्यात असतात हे पाहूया:

-व्हिटॅमिन डी चा 63% शिफारस केलेला आहार (बहुतेक भारतीय जो कमी घेतात!)

-वाढ आणि शारीरिक दुरूस्तीसाठी आवश्‍यक असलेले व्हिटॅमिन बी 2 ज्याची 36% दररोज आवश्‍यकता असते.

-72% आवश्‍यक दैनिक व्हिटॅमिन बी 12, जे शरीराच्या तंत्रिका तंत्र आणि रक्त पेशींसाठी तसेच डीएनए तयार करण्यास आवश्‍यक आहे.

-चयापचय, तंत्रिका, आणि पाचन व हृदयासंबंधी कार्ये यासाठी बायोटीनची 39% दररोज असणारी आवश्‍यकता.

-71% आवश्‍यक असलेले कोलाइन, यकृत कार्य आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्‍यक आहे.

-आपल्याला आवश्‍यक असलेल्या दैनिक प्रमाणात 42% सेलेनियम आपल्याला शिफारस केलेल्या आयोडिनच्या 34% घटक आणि आयोडीन गर्भवती महिलांसाठी विशेषतः महत्वाचे आहे कारण ते आपल्या बाळाच्या बुद्‌ध्यांकेशी जोडले गेले आहे. लोक दुधापासून दूर जातात आणि आयोडीनचे प्रमाण कमी होत जाते, त्यामुळे आहारात ते परत मिळविण्याचा चांगला मार्ग आहे.

माझे रुग्ण सामान्यतः मला हा प्रश्‍न विचारतात, माझे कोलेस्टेरॉल उच्च आहे, मग मी अंड्याचे सेवन मर्यादित करू का?
आणि माझे उत्तर असे आहे की,

-मी असे कोणतेही संशोधन पाहिले नाही जे असे काही सुचवित आहे!
-असे असून देखील, आपल्याला विविध प्रकारचे अन्न खाण्याची गरज आहे. मला असे वाटत नाही की दररोज अंडे खाल्ल्याने काही नुकसान होते, परंतु विविधता खूप महत्वाची आहे.
-फक्त अंडी नाही, आपण ज्या प्रकारे खातो त्याविषयीही हेच आहे!
-बरेचसे मीठ लावून तळलेले अंड्याचा प्रकार हा उकडलेले अंडे खाण्या इतका चांगला नसतो.
-अंडी खाण्याचा आरोग्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे सकर्मब्लड, किंवा मग उकळवणे खाणे हाच आहे. तर, आपल्या मेनूमध्ये परत अंडी मिळवू या!!

What is your reaction?
9 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)