अंडी हा उत्तम आहाराच.! (भाग 1)

-डाॅ. त्रिशला चोप्रा

अंडी हा अन्नघटक बऱ्याचदा विश्‍वसनीय, पौष्टिक, स्वस्त आणि पोषक आहाराच्या स्वरूपात आपण उपयोगात आणू शकतो. बऱ्याच संस्कृतींमध्ये आणि धर्मांमध्ये, अंडी जीवनाचा आणि पुनर्जन्माचा प्रतीक आहेत. या शतकामध्ये, पोषणाची आपली समज सुधारल्याने अंडी आपल्या आहारात बऱ्याच जणांनी समाविष्ट केल्याचे आढळून येते. खरं तर, एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की दिवसातून एक अंड खाल्याने स्ट्रोक आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. संशोधनातून दिसून आले आहे की एका गटातील लोकांनी दररोज अंडी आहारात समावेश केल्याने त्यांचा हृदयविकाराचा धोका कमी झाला!

या जागतिक हृदयरोग दिनानिमित्त आपल्या दैनंदिन जीवनात अंड्याचा बलक समाविष्ट करूयात!

काही वर्षांपूर्वी, अंडी ही दणकट मुलांच्या पौष्टिकतेचे आणि ज्यांत धोकादायक उच्च पातळीचे कोलेस्टेरॉल असते, जे हृदयरोगाच्या आजारांशी जोडले गेले होते असा समज होता.तसेच 3 पेक्षा अधिक अंडी एक आठवड्यात घेऊ नये – आणि कधीही एकाच वेळी दोन अंडी देखील खाऊ नये असा देखील समज प्रचलित होता. म्हणून सकाळी अंडी खाण्याआधी जर तुम्ही देखील दोनदा विचार करत असाल तर त्यांत चुकीच अस काहीच नाही. तथापि, त्या दशकातील असे नकारात्मक समज असूनही, अंडी आहारात समाविष्ट करण्याचा व त्याच्या फायद्यांचा इतिहास फारच सकारात्मक आहे.

तर मग नेमकं अंडी खाण योग्य की अयोग्य ही गोंधळात टाकणारी गोष्ट जाणून घेऊया…

बऱ्याच वर्षांपासून, अंडी खाणं टाळणं जायचं कारण त्यांच्यात कोलेस्टेरॉल जास्त असतं. एक पूर्ण अंड्यात सुमारे 185 मिलीग्राम कोलेस्टेरॉल असते आणि जगभरातील विविध हृदयरोगांच्या तज्ञांच्या अनुसार, प्रति दिन अधिकतम 300 मिलीग्राम कोलेस्टेरॉल चालू शकते- म्हणून दोन अंडी आपल्याला कोलेस्टेरॉलच्या अधिकतम मर्यादेच्या पातळी पर्यंत शरीराला कोलेस्टेरॉल पोहचवतात. कोलेस्टेरॉल हृदयरोगाशी निगडीत असल्याने, हे साहजिकच आहे की कोलेस्टेरॉल युक्त पदार्थ जास्त खाणे धोकादायक असू शकते.चेतावणी जारी करण्यात आल्या, आणि अंडी खाण्याचं भय कमी झालं आहे.

कोलेस्टेरॉल शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारे आणि यकृताद्वारे तयार होते. आपल्या शरीरातील पेशी कसे कार्य करतात ह्यांत महत्त्वाची भूमिका कोलेस्टेरॉलची असते आणि व्हिटॅमिन डी, हार्मोन आणि पित्त तयार करण्यासाठी देखील आवश्‍यक असते. आपल्या रक्तातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल धमनीच्या भिंतीवर जमते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. आपल्या अन्नातील कोलेस्टेरॉलचा रक्तातील कोलेस्टेरॉलवर फारच थोडासा प्रभाव पडतो.

त्यापेक्षा खाद्यपदार्थांमधील संतृप्त चरबीचा आपल्या कोलेस्टेरॉल पातळी वर धोकादायक परिणाम होतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, उकडलेल्या अंड्यात सुमारे 3.3 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम संपृक्त चरबी असते तर बटरमध्ये ही 51 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम इतकी असते. आपण आता हे ठरवू शकता की, आपल्या शरीराला कुठल्या प्रकारच्या खाद्यपदार्थ खाल्याने त्रास होऊ शकतो! मांस आणि डेअरी उत्पादनांमध्ये तसेच नारळ किंवा पाम तेले असलेले अन्न ह्यांतील संपृक्त प्रमाणित चरबी ही रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते. असंपृक्त चरबी असलेलं (तेलकट मासे, काजू, बियाणे, एवोकॅडो, भाजी तेले) प्रत्यक्षात कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात.

हे कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे माहित असणे आवश्‍यक आहे की, दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात : हाय-डेंसिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) व लो-डेंसिटी लिपोप्रोटीन (एलडीएल), अन्यथा वाईट आणि चांगले कोलेस्टेरॉल म्हणून देखील आपण त्याचा उल्लेख करू शकतो.

अंडी हा उत्तम आहाराच.! (भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)