शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न 

नवी दिल्ली – देशाचे नवे कृषी निर्यात धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. या धोरणाअंतर्गत कृषी विशिष्ट विभाग तयार करण्यात येतील. अपेडा आणि भारत-जर्मनी वाणिज्य मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सेंद्रीय उद्योग क्षेत्रातल्या जगातल्या सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे बायोफे इंडियाचे उद्‌घाटन करताना ते म्हणाले की, बागायती उत्पादनासह भारतात सुमारे 600 मेट्रिक टन कृषी उत्पादन घेतले जाते.

या उत्पादनात वृद्धी करून आणि धान्याची नासाडी कमी करून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचे धोरण आहे. कृषी उत्पादनांची निर्यात करण्यावरही सरकार लक्ष देत आहे. देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेचाही हळूहळू विस्तार होत असून सेंद्रीय उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिका, युरोपियन महासंघ, कॅनडा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, न्युझीलंड आणि जपान या देशांना भारत सेंद्रीय उत्पादनांची निर्यात करतो. या कार्यक्रमात 15 देशातले ग्राहक सहभागी होत आहेत. काजूगर, नारळ, चहा, तेल बिया यासारखी सेंद्रीय उत्पादने यामध्ये मांडण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)