प्रभावशाली प्रियंका

नुकतेच प्रियंका चोप्राला “पॉवर आयकॉन’ यादीत सामील केले गेले आहे. या यादीत मनोरंजन जगाच्या 50 सर्वात शक्‍तिशाली महिला समाविष्ट केल्या जातात. प्रियंका चोप्राने तीन वेळा ऑस्कर विजेत्या मेरिल स्ट्रीप, ओपरा विनफ्रे, बेयॉन्से, जेनिफर लॉरेन्स, ऍलन डिजेनेरेस आणि निकोल किडमॅन समेत इतर आंतरराष्ट्रीय व्यक्‍तिमत्त्वांसह या यादीत स्थान मिळविले आहे.

आपल्या या उपलब्धतेबद्दल प्रियंका चोप्रा म्हणाली की, माझ्यासाठी हे यश ऊर्जा प्रदान करणारे आहे. ही ऊर्जा आपल्याला आपले इच्छित कार्य करण्यास प्रेरित करते. मला स्वतःचा अभिमान वाटत आहे कारण की आज मी त्या महिलांसह उभी आहे ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी आव्हानाला सामोर गेल्या आणि आज आपल्या करियरमध्ये
सर्वोत्तम टप्प्यावर आहे.

हे पहिल्यांदाच नाही जेव्हा कोणत्याही पॉवर लिस्टमध्ये प्रियंका समाविष्ट केली गेली आहे. या पूर्वी 2018 मध्ये फोर्ब्सच्या सर्वाधिक शक्‍तिशाली महिलांच्या यादीत प्रियंकाला सामील केलं होत. 2017 मध्ये मोस्ट 500 इनफ्लुएंशियल पीपल इन एंटरटेंमेंट यादीत देखील तिला सामील केले होते.

प्रियंका चोप्रा द स्काय इज पिंक या चित्रपटातून तीन वर्षानंतर बॉलीवूडकडे परत येत आहे. प्रियंकाने अमेरिकन टेलिव्हिजन ड्रामा शृंखला क्वांटिकोमध्ये ऍलेक्‍स पॅरिशची भूमिका बजावून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त केली आहे. 2017 मध्ये तिने ऍक्‍शन-कॉमेडी बेवॉचमधून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)