पुढील वर्षी पुन्हा अल-नीनो’चा प्रभाव -डब्ल्यूएमओ

जीनिव्हा (स्वित्झर्लंड): पुढील वर्षी अल-नीनो चा प्रभाव जाणवणार असल्याची माहिती जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) दिली आहे. अल-नीनोचा प्रभाव चालू वर्षीच हिवाळ्यात सुरू होणार असल्याचा अंदाज अगोदर व्यक्त करण्यात आला होता. पूर्व आणि मध्य पॅसेफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान वाढण्याच्या स्थितीला अल-नीनो असे नाव देण्यात आले आहे.

यापूर्वी सन 2015-16 मध्ये अल-नीनोचा प्रभाव जाणवला होता, आणि तो अतिशय तीव्र होता. या वेळी मात्र तो तेवढा तीव्र नसेल असे जागतिक हवामान संघटनेचे संचालक मॅक्‍स डिले यांनी सांगितले आहे. कमजोर असला, तरी या वर्षी अल-नीनोचा प्रभाव अनेक क्षेत्रातील पाऊस आणि तापमानावर पडणार आहे. सतत वाढत असलेल्या तापमानाचा 2019 मध्ये कृषी क्षेत्रावर दुष्परिणाम होणार आहे.

जागतिक तापमानात पडणाऱ्या एका अंशाच्या वाढीमुळे जगभरात अनेक वादळे आणि वक्रीवादळे येत आहेत, असे शास्त्र्रज्ञांचे निवेदन आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक हवामानात चार अंशांची वृद्धी होणार असल्याची आणि तो मानवतेसाठी मोठाच धोका असण्याची शक्‍यता शांस्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

सन 2015 मध्ये पॅरिस येथे झालेल्या पॅरीस समझोत्यानुसार जागतिक तापमान वृद्धी दोन अंश सेल्सियसपर्यंत रोखण्याचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले होते. त्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, परंतु त्या बाबतीतील प्रयत्न खूपच कमी पडल्याचे डब्ल्यूएमओच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)