“आयएलएफएस’ प्रकरणी ईडीचे छापे 

6 लाखांचे विदेशी चलन जप्त 

नवी दिल्ली – “आयएस ऍन्ड एफएस’ प्रकरणी सक्‍तवसुली संचलनालयाने मुंबई आणि दिल्लीच्या परिसरामध्ये किमान 6 ठिकाणी छापे घातले आणि 6 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. “इन्फ्रास्ट्रक्‍चर लिजींग ऍन्ड फायनान्शियल सर्व्हिसेस’च्या व्यवहारात गैरव्यवहार आढळल्याने आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकरण “ईडी’ने दाखल केले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आयएल ऍन्ड एफएस’च्या व्यवस्थापनाच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले. त्यामध्ये माजी अध्यक्ष रवी पार्थसारथी यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
या छाप्यांदरम्यान 6 लाख रुपयांचे विदेशी चलन, वेगवेगळ्या मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे, गुन्हेगारी स्वरुपाचे दस्ताऐवज, रेकॉर्ड आणि फोटो ताब्यात घेण्यात आले, असे “ईडी’ने म्हटले आहे. दिल्ली पोलिसांकडे “आय एल ऍन्ड एफएस’समुह आणि व्यवस्थापनाविरोधात फसवणूकीच्या नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे “ईडी’ने हे प्रकरण दाखल करून घेतले आहे. “आयएल ऍन्ड एफएस’ने सप्टेंबर 2018 च्या सुरुवातील “सिडबी’ आणि सहायक कंपन्यांचे 91 हजार कोटींचे कर्ज बुडवल्याचे हे प्रकरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)