कलंदर : अखेर जमलं…

-उत्तम पिंगळे

परवाच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो तर ते चक्‍क मराठी गाणी लावून बसले होते.

मी : नमस्कार प्राध्यापक साहेब. तुमच्या राज्यात शेवटी युती संपन्न झाली म्हणायची?
विसरभोळे : आपण कोणत्या राज्याचे म्हणायचं?

मी : तसे नाही बरेच दिवस वाद चालू होता युती होणार की नाही. अगदी टोकाची भूमिका दोघांनी घेतली होती म्हणून म्हणतो.

विसरभोळे : हे पाहा जर नीट विचार केला तर युती होणार हे दोघांचाही फायद्यातचं आहे. त्यापेक्षा युती न होण्याने दोघांचाही जास्त तोटा होणार होता. काय आहे माहित आहे का? या घडीला एनडीएतून अनेक जण बाहेर गेले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर एवढी वर्ष युती असलेला पक्ष बाहेर पडला तर त्याचे दूरगामी परिणाम होतील व आनेक इतर मित्र पक्षही विचार करू लागतील.

मी : होय पण हे युतीचे सरकार असूनही दोघे जण परस्परांना पाण्यात पहात होते.

विसरभोळे : लोकांची स्मरणशक्ती खूप अशक्त असते. जातात विसरून पटकन.

मी : हो पण दोहो बाजूंचे कार्यकर्ते अगदी कामाला लागले होते म्हणजे बघा दोघांनीही 48 उमेदवार उभे करायचे जवळजवळ ठरवले होते. म्हणजे एकूण 96 मग आता युती झाल्याने 48 जणांचा पत्ता कट होणार आणि मग बंडोखोरी वाढेल त्याचे काय?

विसरभोळे : तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. एक दोन ठिकाणी युतीनंतरही वादावाद होणारच आहे. पण मुख्य म्हणजे ज्यांना तिकीट मिळेल त्यांचा विजय होण्याची शक्‍यता वाढली आहे हे निश्‍चित.अर्थात विरोधी आघाडीही होणार आहे त्यामुळे काटेंकी टक्कर आहे असे वाटत आहे.

मी : हो पण आता एकदिलाने कार्यकर्ते काम करणे कठीण वाटत आहे कारण बहुतेक कार्यकर्त्यांनी एकला चलो रे… साठी तयारी केली होती. तसेच नेतेही असे बरळत होते की आता मीडियासमोर त्यांना बोलणेही कठीण जाणार आहे.
विसरभोळे : हे पाहा जसे युद्धात प्रेमात सारे क्षम्य असते तसेच आता राजकारणाचेही झाले आहे बऱ्याच पक्षांची आयडेंटिटी असणारे मुद्देही बोथट झालेले आहेत. त्यामुळे सत्तेसाठी राजकीय डावपेच खेळावेच लागतात.

मी : मग आता जागा वाटपात काही अडचण? (त्यांनी लिहिलेले गाणे दाखविले…)

झ्या गळा, माझ्या गळा
गुंफू ‘युतीच्या’ माळा
ताई, आणखी कोणाला?
घे रे ‘दादा’ ‘रिपाइंला’!
तुज ‘सांगली’, मज भिवंडी!
आणखी ‘माढा’ कोणाला?
वेड लागले दादाला!
मला कुणाचे? ताईला!
तुज ‘परभणी’, मज ‘शिर्डी!
आणखी ‘अकोला’ कोणाला?
दादा, सांगू ‘शहाला’?
सांग ‘धनुष्या’ स्वारीला!
खुसू खुसू, गालि हसू
वरवर अपुले रुसू रुसू
चल निघ, येथे नको बसू
‘मीडिया’ मागे लागली घूसू!
कशी कशी, आज अशी
गंमत ताईची खाशी!
अता कट्टी फू ‘वादाशी’
तर मग गट्टी कमळाशी?
तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू ‘युतीच्या’ माळा…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)