कहे कबीर : खरी फलप्राप्ती   

अरुण गोखले 

तीरथ गएसे एक फल,
संत मिले फल चार।
सतगुरू मिले अनेक फल,
कहे कबीर विचार।।

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तीर्थक्षेत्रीचे एक फळ,
अन्‌ संत भेटीचे चार।
सदगुरू भेटी अनेक फल,
सांगे कबीर विचार।।

पुण्य संचयाच्या आपल्या ज्या अनेक कल्पना आहेत. त्यातील एक प्रमुख कल्पना म्हणजे माणसाने अधिकाधिक तीर्थाटन करावे, तीर्थी स्नान आणि देवदर्शन घ्यावे, म्हणजे पुण्याईचे फळ त्याच्या पदरी पडते. कबीर जेव्हा या सर्व गोष्टीचा साक्षीत्वाने, जागरुकतेने विवेकाने विचार करतात. तेव्हा ते आपल्या अनुभवाच्या जोरावर असे सांगतात कि माझ्या विचाराने माणसाला तीर्थ क्षेत्री जाण्याने जर समजा एक टक्का फळ प्राप्ती होत असेल तर संतांच्या भेटीने मात्र तीच फल प्राप्ती ही चार पट जास्त मिळते. हे असं का? तर त्यांना असं सांगायच आहे की संत हेच देवाचे खरे रूप आहे. देवाची भेट, त्याच्या संगतीत होते. संतांच्या सहवासात सत्‌चे ज्ञान मिळते. तो खरा परमात्मा कळतो. त्यामुळेच तीर्थाटनाला जाण्यापेक्षा जीवानी संताच्या सहवासात अधिकाधिक जावे.

कारण संत मायबाप हेच खऱ्या अर्थाने जीवाला योग्य असाच मार्ग दाखवतात. अशा संतांच्या सत्‌पुरुषांच्या भेटीतच पुढे कुठेतरी त्या आर्त जिज्ञासू जीवाला सदगुरू भेटतो. ज्याला भाग्याने सदगुरूची प्राप्ती होते, त्याला प्राप्त होणारे पुण्य हे किती पट असते ते काय आणि कोणत्या शब्दांत सांगावे. कारण सदगुरू हाच जीवाशिवाची गाठ घालून देतो. तोच आपल्या मनातला विवेक जागवून माया, मोह, ममतेचे एक एक करून सारे पाश हे ज्ञान खडगाच्या सहायाने तोडून बद्ध जीव मोकळा करतो. तो जो देव जीव तीर्थक्षेत्री शोधत असतो, तो देव त्याला त्याच्या अंतरंगातच कसा आत्मतत्त्वाच्या रूपाने वसलेला आहे ते दाखवतो. त्याची भेट करतो. जीवाची खऱ्या सुख सौख्यदात्याशी गाठ घालून देतो. त्यामुळेच कबीरांच्या लेखी सदगुरूंशी होणारी भेट हाच जीवनातला अधिकाधिक लाभाचा आणि कल्याण कारक असा क्षण आहे. त्यासाठी प्रत्येकानेच तीर्थयात्रा करीत संत शोधावेत, त्यातून सदगुरू पारखून घ्यावा. सदगुरूची भेट झाली की त्याला न मागताच सर्व काही मिळतेच. एक भगवंतच त्याला मिळाल्यावर, अन्य काही कोणाकडे मागावे अशी त्याची अवस्थाच राहात नाही. गुरू भेटीने आणि प्रभूकृपेने त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सार्थ होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)