नवी दिल्ली- स्टर्लिंग बायोटेक घोटाळ्याबाबत अभिनेता डिनो मोरिया आणि डिजे अकील यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे. स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड, संदेसरा ग्रुप, नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती चेतन संदेसरा यांच्याविरोधात सीबीआयने पाच हजार 700 कोटी रुपयांच्या फसवणुकीची केस दाखल केली होती.
हा घोटाळा पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्यापेक्षा देखील मोठा असल्याचे म्हटले जात आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या घोटाळ्याहीपेक्षा कित्येक पटीने मोठा हा घोटाळा असल्याचा दावा ईडीने केला आहे.
डिनो मोरिया आणि डिजे अकील यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून संदेसरा बॅंक कर्ज प्रकरणात या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. हा घोटाळा जवजवळ साडे चौदा हजार कोटींचा असून याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. डिनो मोरिया आणि डिजे अकील यांचे या कंपनींसोबत काही व्यवहार झाले असल्यामुळे या दोघांना समन्स बजावण्यात आले आहेत.