ईडीने तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी 

पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्‍सीच्या वकिलांची न्यायालयात माहिती 

नवी दिल्ली –
पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्‍सी याची चौकशी करायची असल्यास अंमलबजावणी संचालनालयाचे पथक अँटिगात जाऊ शकते किंवा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यत तीन महिने प्रतीक्षा करावी, असे मेहुल चोक्‍सीच्या वकिलांनी शनिवारी न्यायालयात सांगितले.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 11 जून रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी या दोघांविरोधात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या अर्जावरील सुनावणी दरम्यान शनिवारी मेहुल चोक्‍सीच्या वकिलांनी बाजू मांडली.

-Ads-

मेहुल चोक्‍सीच्या वकिलांनी सांगितले की, मेहुल चोक्‍सी याची प्रकृती सध्या चांगली नाही. तो प्रवासासाठी वैद्यकीयदृष्ट्‌या फिट नाही. त्यामुळे “ईडी’चे पथक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचा जबाब घेऊ शकतात “ईडी’ची एक टीम अँटिगा येथे जाऊ शकते, असे चोक्‍सीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. मेहुल चोक्‍सीच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत ईडीने तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी, त्यानंतर ते जबाब नोंदवण्यासाठी परतू शकतील, अशी माहिती वकिलांनी दिली.

दरम्यान, सहा नोव्हेंबर रोजी ईडीने मेहुल चोक्‍सीचा सहकारी दीपक कुलकर्णी याला अटक केली होती. कोलकाता विमातळावरून दीपक कुलकर्णीला अटक करण्यात आली. हॉंगकॉंगवरुन तो कोलकाता येथे आला होता. दीपक कुलकर्णी हॉंगकॉंगमध्ये असलेल्या एका डमी फर्मचा संचालक आहे. ही फर्म मेहुल चोक्‍सीशी संबंधित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)