पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीची नोटीस

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस फेमा (FEMA) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बजावण्यात आली आहे. राहत फतेह अली खान यांच्यावर भारतात विदेशी चलनाच्या तस्करीचा आरोप आहे. ईडीने राहत फतेह अली खान यांच्याकडून 45 दिवसांत उत्तर मागितले आहे.

राहत फतेह अली खान यांनी अवैधरित्या 3 लाख 40 हजार यूएस डॉलर कमावले आहेत. त्यांनी त्यापैकी 2 लाख 25 हजार डॉलरची तस्करी केल्याचे म्हटले जात आहे. जर त्यांच्या उत्तराने ईडीचे समाधान झाले नाही तर तस्करी केलेल्या रकमेवर 300 टक्के दंड द्यावा लागणार आहे. तसेच दंड न भरल्यास त्यांना लुकआऊट नोटीस बजावली जाईल. सोबतच भारतात त्यांच्या कार्यक्रमांवर बंदीही घातली जाऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, 2011मध्ये राहत फतेह अली खान यांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वा लाख डॉलरसोबत पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडे या रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज नव्हते. त्यामुळे राहत फतेह अली खान यांच्यासह मारुफ अली खान यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

राहत फतेह अली खान यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. सुफियाना अंदाजात त्यांनी गायलेली रोमॅन्टिक गाणी कानसेनांना भुरळ पाडतात. भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असूनही अनेक बॉलिवूड दिग्दर्शक राहत फतेह अली खान यांना आपल्या चित्रपटांसाठी गायला सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)