नीरव मोदीवर आणखी एक मोठी कारवाई

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी आणि अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदीवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये नीरव मोदीची 637 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

नीरव मोदीवरच्या या सगळ्यात मोठ्या कारवाईमध्ये त्याची 637 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पीएमएलएअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या 216 कोटींच्या दोन स्थावर मालमत्ता आणि संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान नीरव मोदीच्या 5 परदेशी बँक खाती सिल करण्यात आली आहेत. या परदेशी बँक खात्यामध्ये तब्बल 278 कोटी रुपये आहेत.

-Ads-

पंजाब नॅशनल बॅंकेला कोट्यवधी रूपयांचा चूना लाऊन नीरव विदेशात फरार झाला आहे. नीरव मोदीने केलेल्या गैरव्यवहारामुळे पंजाब नॅशनल बॅंकेला एकूण 14,357 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेने यासंदर्भातील तोट्याची आकडेवारी प्रसिद्ध केली होती.

दरम्यान, लोकसभेने जारी केलेल्या नव्या विधेयकाच्या कायद्यानुसार, आता विदेशात पळून गेलेल्यांवर भारतीय काद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार तपास यंत्रणांना देण्यात आले. या कायद्यानुसार नीरव मोदीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)