ऍम्नेस्टी इंटरनॅशनलवर “ईडी’ची कारवाई 

बंगळुरू – बेंगळुरु येथे असलेल्या ऍम्नेस्टी इंटरनॅशनल कार्यालयावर गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला कारवाई केली. ही कारवाई परकीय देणगी नियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आली आहे, अशी माहिती ईडीच्या अधिका-यांकडून देण्यात आली.

बेंगळुरु येथे ऍम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेच्या कार्यालयावर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ईडीच्या पथकाने छापा टाकला. रात्री उशीरापर्यंत ईडीच्या पथकाकडून कार्यालयाची तपासणी करण्यात आली. परकीय देणगी नियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईबाबत अद्याप ईडीने सविस्तर माहिती दिलेली नाही. “ऍम्नेस्टी इंटरनॅशनल’ ही मानवाधिकार क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेने ऍम्नेस्टीवर राजद्रोहाचा आरोप केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपूर्वी ईडीने ग्रीनपीस या संघटनेच्या कार्यालयांवर छापा टाकला होता. या विरोधात ग्रीनपीसने न्यायालयात धाव घेतली होती. परकीय देणगी नियम कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन करणा-या बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थांवर (एनजीओ) केंद्र सरकारने यापूर्वीही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)