खरेदी वाढल्याने सेन्सेक्‍स पुन्हा 36 हजारांवर

ग्राहक वस्तू, रिऍल्टी आणि बॅंकिंग क्षेत्र आघाडीवर

प्रिंट मीडिया कंपन्या तेजीत

केंद्र सरकारने प्रिंट मीडियामधील जाहिरातीचे दर 25 टक्‍क्‍यांनी वाढविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शेअर बाजारावर नोंदलेल्या मीडिया कंपन्यांच्या शेअरच्या भावात 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाचा फायदा मध्यम आणि छोट्या वृत्तपत्रांना जास्त प्रमाणात होणार आहे. नियमित आढावा घेतल्यानंतर या जाहिरातीचे दर वाढविण्यात आले असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जाहिरात विभागाने म्हटले आहे.

मुंबई – चीन आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापारातील तणाव कमी होण्याची शक्‍यता वाढली असल्यामुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्याने बुधवारी सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकांत वाढ झाली. त्याचबरोबर कंपन्याच्या तिसऱ्या तिसऱ्या तिमाहीच्या ताळेबंदाबाबत गुंतवणूकदार आशावादी आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 231 अंकानी म्हणजे 0.64 टक्‍क्‍यांनी वाढून 36212 अंकावर बंद झाला. गेल्या तीन दिवसात सेन्सेक्‍स 467 अंकानी वाढला होता. आज विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 53 अंकांनी वाढून 10855 अंकावर बंद झाला. सकाळी निर्देशांक बरेच वाढल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे निर्देशांकाना ती पातळी राखता आली नाही.

भारतात आता गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा विकास दर 7.3 टक्‍के राहल तर पुढील दोन वर्ष तो किमान 7.5 टक्‍के राहील असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. त्याचबरोबर या वर्षाचा विकास दर किमान 7.2 टक्‍के राहील असे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आश्‍वस्त झाले आहेत.

दरम्यान काल झालेल्या व्यवहारानुसार काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 698 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 553 कोटी रुपयांचा नफा काढून घेतला.

आज झालेल्या खरेदीचा फायदा ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांना झाला. या क्षेत्राचा निर्देशांक आज 1.11 टक्‍क्‍यांनी वाढला. त्याचबरोबर रिऍल्टी आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरच्या भावातही आज वाढ नोंदली गेली. मात्र आज धातू, पायाभूत सुविधा आणि तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्याना विक्रीचा फटका बसला.

इन्फोसिस कंपनीचा ताळेबंद गुरुवारी जाहीर होणार आहे. कंपनी आणखी बऱ्याच शेअरचे बायबॅग करणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. या कारणामुळे बंगळूरूस्थित या कंपनीच्या शेअरच्या भावात बुधवारी 1 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)