सावध गुंतवणूकदारांकडून नफेखोरी

निर्देशांकांत घट; बॅंकिंग क्षेत्राला सर्वाधिक फटका

मुंबई -काही तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन कमी करण्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले आहे. याचबरोबर निर्देशांक सध्या बऱ्याच वरच्या पातळीवर गेल्यामुळे सावध गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे चार दिवसांनंतर भारतीय शेअर बाजारात निर्देशांक घसरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक बाजारातूनही फारसे उत्साहवर्धक संकेत आले नाहीत. सायंकाळी काही कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार असल्यामुळेही गुंतवणूकदार सावध असल्याचे चित्र बाजारात होते. त्यामुळे गुरुवारी बाजार बंद होतांना मुंबई शेअरबाजाराचा
निर्देशांक सेन्सेक्‍स 106 अंकांनी म्हणजे 0.29 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 36106 अंकांवर बंद झाला. आज विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 33 अंकांनी कमी होऊन 10821 अंकांवर बंद झाला.

त्यातच आज रुपयाच्या मूल्यातही 10 पैशांची घट नोंदली गेल्यामुळे निर्देशांकाना आधार मिळू शकला नसल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. आज झालेल्या पडझडीचा सर्वात मोठा फटका बॅंकिंग क्षेत्राला बसल्याचे दिसून आले. शेअरबाजारांनी जारी केलेल्या माहितीनुसार काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 276 कोटी रुपयांच्या तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 438 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. त्यामुळे एकूण वातावरण स्थिर असल्याचे बोलले जाते.

जागतिक शेअरबाजाराचे निर्देशांक आज काही प्रमाणात कमी झाले. भारतात आता तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. त्यामुळे त्या आधारावर आगामी काळात निर्देशांकांना दिशा मिळण्याची शक्‍यता असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. आज झालेल्या विक्रीमुळे इंडस्‌ इंड बॅंक, कोटक बॅंक आणि स्टेट बॅंकेच्या भावात 2.36 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली. आजच्या पडझडीतही टाटा मोटर्स, इन्फोसिस इत्यादी कंपन्यांचे शेअर वधारले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)