सरलेल्या वर्षात बऱ्याच कंपन्यांच्या आयपीओकडून कमी परतावा

मुंबई – चालू वर्षात भारतीय शेअरबाजारातील काही कंपन्यांच्या आयपीओ दरामध्ये घसरण झाली आहे. यात जवळपास 24 कंपन्यांची कामगिरी असमाधानकारक झाली आहे. आतापर्यंत या कंपन्या आयपीओ लिसिंटग किमतीच्या खाली जात व्यवहार करत आहेत.

काही कंपन्यांचे आयपीओ निर्धारित असलेल्या किमतीत 56 टक्‍क्‍यांच्या खाली घसरणीची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या प्रभावामुळे नकात्मक उलाढाल झाली आहे. त्याचाच परिणाम संबंधित कंपन्यांच्या आयपीओवर झाला असल्याची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चालू वर्षात जानेवारी ते जून या कालावधीत आयपीओने नकारात्मकच कामगिरी केली आहे. दुसऱ्या सहामाहीत प्रायमरी मार्केटमध्ये मंदी राहिली होती. त्या कारणांमुळे सेबीने यावर चिंता व्यक्‍त करत गुंतवणूक आणि बाजारातील वातावरण बदलण्यासाठी प्राइसवर चर्चा करण्याची गरज असल्याचे मत नोंदवले आहे.

सेबीने चालू वर्षात 60 हजार कोटी रुपयांच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. ऑक्‍टोबरपर्यंत 24 कंपन्यांनी मिळून आयपीओच्या आधारे 30 हजार 959 कोटी रुपये जमा केले आहेत. मात्र आगामी काळ आशवादी राहण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)