पुण्याच्या रिऍल्टी क्षेत्रात आशावाद परतला

रोहित गेरा : परवडणाऱ्या घरांच्या मागणीत सकारात्मक वाढ

पुणे – पुणे, गोवा व बंगळुरुमध्ये पुरस्कार प्राप्त महत्वाच्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांची उभारणी करणाऱ्या गेरा डेव्हलपमेंटसनी जानेवारी 2019 साठीचा गेरा पुणे निवासी बांधकाम अहवाल सादर केला. नवीन अपार्टमेंटच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे या अहवालातून दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेरा डेव्हलपमेंटसचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा म्हणाले, सततच्या मंदीनंतर अखेरीस आता पुण्याच्या बांधकाम व्यवसायात आशेचे किरण दिसू लागले आहेत. परवडणाऱ्या किंमतीतील घरांना चालना मिळत असताना पुण्यातही या प्रकारांतील घरांच्या नवीन सादरीकरणात वाढ दिसून येत आहे.

2017च्या तुलनेत 2018मध्ये बजेट विभागातील घरांच्या नवीन सादरीकरणात 16%नी तर विशेष मोल असणाऱ्या घरांच्या नवीन सादरीकरणात 21%नी वाढ झाली आहे. या दोन्ही विभागांत मिळून एकूण नवीन सादरीकरणात 69% वाढ झाली आहे.

जून 17 – डिसेंबर 17 मध्ये अपार्टमेंट संख्येत 24,792 ने वाढ झाली तर जून 2018-डिसेंबर 2018मध्ये बाजारपेठेत 40,885 नवीन अपार्टमेंटची वाढ झाली. वार्षिक तत्वावर विक्रीतही 15%नी वाढ झाली आहे. जून 17- डिसेंबर 17 मध्ये 36,086 अपार्टमेंटची प्राथमिक बाजारपेठेत विक्री झाली, तर जून 2018-डिसेंबर 2018 मध्ये 41,562 अपार्टमेंटची विक्री झाली.

मागणीमध्ये वाढ झालेली असली तरी दर चौरस फुटामागचा भाव कमी होत आहे. गेल्या 6 महिन्यात तर सरासरी दर चौरस फुटांच्या दरात 2.21% इतकी घट झाली आहे. शहरातील सरासरी दर प्रत्येक चौरस फुटाला 4,582 रुपये या किंमतीपर्यंत खाली आला आहे. परवडणाऱ्या किंमतीतील घरांच्या विभागाला वाढती मागणी लक्षात घेऊन अशा घरांच्या संख्येत होत असलेली वाढ ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे अधिकाधिक घर खरेदीदारांचा या संघटति विभागांत प्रवेश होईल.

दर 6 महिन्यांमधील माहितीवर आधारित संकलनाकडे बघता नवीन सादरीकरणामध्ये वार्षिक वाढीच्या 22% दराच्या तुलनेत 29% अधिक वाढ दिसून येत आहे. प्रिमीयम प्लस विभागांतील सादर झालेल्या युनिट्‌सची संख्या 6,543 असून वाढीचा दर 65% इतका आहे. बजेट विभागाचा नवीन सादरीकरणामधील हिस्सा जाणवण्याइतपत म्हणजे 48% आहे , असे अहवालात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)