पेट्रोल आणखी स्वस्त होणार!

क्रुडच्या किमती जागतिक मंदीमुळे पुन्हा घसरल्या; क्रुड 85 डॉलरवरुन घसरले 53 डॉलर प्रती पिंप या पातळीवर

नवी दिल्ली – कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारी घसरण आणि इतर कारणामुळे आगामी काळात पेट्रोलचे दर आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे. आज जागतिक बाजारात क्रुड तेलाचे दर 3.78 डॉलरनी कमी होऊन 53.20 डॉलर प्रती पिंप या पातळीवर आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लंडनमध्ये जुलै 2017 नंतर प्रथमच कच्च्या तेलाची किंमतीत इतकी मोठी घट नोंदली गेली आहे. या बरोबरच जगभरातील आर्थिक क्षेत्रातील मार्केटमध्ये सुरू असलेल्या चढ उताराच्या कारणामुळेच हे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे.

या वातावरणामुळे तेल निर्यात करणाऱ्य़ा देशांची संघटना असणाऱ्य़ा ओपेक संस्थेसह अन्य देशांनी आपल्या तेल उत्पादनात कपात करणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आगामी काळात तेलाच्या किंमतीत वाढ होणार असल्याचा अंदाज मांडण्यात येत होता.

परंतु आता परिस्थती उलट झाली आहे. रशियाचे ऊर्जा मंत्री ऍलेक्‍झाडर नोवाक यांनी गुंतवणूकदाराना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे की, ओपेक आणि इतर सहकारी देश यांच्यात आगामी वर्षातील पहिल्या सहा महिन्यासाठी तेल मार्केटमध्ये स्थिरता यईल. हेच वातावरण राहिल्यास येणाऱ्य़ा काळात तेल उत्पादक देश योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यानी म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत 40 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. जागतिक विकास दर कमी होत असल्यामुळे विविध देशाकडून तेलाची मागणी कमी होत असल्यामुळे सध्या तेलाचे दर कमी होत असल्याचे व्यापाऱ्यानी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)