रेराचा रिऍल्टीतील संघटीत क्षेत्राला अधिक फायदा

मुंबई – जीएसटी व रेरामुळे संघटीत क्षेत्रातील कंपन्या आता रिऍल्टी क्षेत्रात अधिक काम करू लागल्या आहेत. त्याचबरोबर रेरामुळे या क्षेत्राला काम करणे अधिक सोईचे झाले असल्याचे अरविंद स्मार्टस्पेसेसचे व्यवस्थापकीय संचालक कमल सिंघल यांनी सांगतले.

ते म्हणाले की, आता नोटाबंदी, जीएसटी आणि रेराचा सुरुवातीचा नकारात्मक परिणाम संपुष्टात आला आहे. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्राला उभारी येण्याची शक्‍यता आहे. सरकारने परवडणाऱ्या घरांना चांगली चालना दिली आहे. त्यामुळे देशभरात अश्‍या प्रकल्पांची संख्या वाढू लागली असल्याचे त्यांनी सांगीतले. या क्षेत्राला काही प्रमाणात भांडवल टंचाई भासु लागली होती. मात्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक एनबीएफसीच्या भांडवल सुलभतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे तो परिणाम फार काळ रेंगाळणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रातील रेरा यंत्रणा अतिशय कार्यक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कंपनी आता मुंबई आणि पुण्यात काम सुरू करण्याच्या शक्‍यता आजमावत आहे. पुण्यात सुरू करण्यात आलेल्या अरविंद इलान योजनेवेळी महारेराचा चांगला अनुभव आला. बंगळूरू आणि पुण्यातील स्थिती रिऍल्टीसाठी चांगली असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)