सोन्याच्या दरात घसरण चालूच; चांदी स्थिर

नवी दिल्ली – मंगळवारीही सोन्याच्या दरात पन्नास रुपयांची घसरण झाली, मात्र चांदीचे दर स्थिर राहिले, असे अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे. एकूणच जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण असल्यामुळे व भारतातूनही मागणी कमी नसल्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

दिल्ली सराफात मंगळवारी शुद्ध सोन्याचे दर 50 रुपयांनी कमी होऊन 32,670 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर स्टॅंडर्ड सोन्याचे दर 50 रुपयांनी कमी होऊन 32,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. जागतिक परिस्थिती आणि स्थानिक मागणी संतुलित असल्यामुळे मंगळवारी तयार चांदीचे दर 37,350 रुपये प्रति किलो या पातळीवर स्थिर राहिले. जागतिक व्यापार युद्ध पाहता धातू बाजारात आगामी काही काळात तरी अस्थिरता राहण्याची जास्त शक्‍यता असल्याचे व्यापाऱ्यांना वाटते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here