बॅंका आणि वित्त संस्थांना बळकट करण्याचा सरकारचा प्रयत्न

प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे अर्थमंत्रालयाचे आर्थिक सेवा सचिव राजीव कुमार यांनी सांगितले.

बॅंका कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बांधील असून त्या सक्षम होण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षांत सरकारचे राजकोषीय शहाणपण, आर्थिक अनुशासन, महागाई नियंत्रण आणि सार्वजनिक खर्चात वाढ, नैसर्गिक स्रोतांचे पारदर्शक वाटप, डिजिटलाइझेशन याद्वारे हे सर्व संपादन केले आहे.

आर्थिक तूट 4.5 टक्‍क्‍यांवरून 3.4 टक्‍क्‍यांवर आणण्यात यश आले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाचा आकार आज 15.59 लाख कोटी ते 24.59 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. पुढील वर्षी हा आकार 27.84 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल, या पाच वर्षांच्या कालावधीत 58% वाढ झाली आहे. यामुळे सरकारने भांडवली खच वाढविला आहे.

महागाई 9% पासून 4% पर्यंत खाली आहे; चालू खाते तूट सुमारे 2.8% आहे. व्यावसायिक सुलभीकरणात सरकारने जागतिक पातळीवर 50 वे स्थान पटकावले आहे. हे सर्व सरकारच्या आर्थिक सुधारणांसाठी घेतलेल्या प्रयत्नांमुळे शक्‍य झाल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)