आयुर्वेदिक उत्पादनाच्या निर्यातीसाठी पोषक वातावरण

नवी दिल्ली – कसलाही नकारात्मक परिणाम न करता आजार दूर करण्याच्या वैशिष्ट्यामुळे आयुर्वेदीक उत्पादनांचे महत्त्व वाढत आहे. त्याचबरोबर भारतीय बाजाराबरोबरच परदेशातूनही भारतीय उत्पादनांना मागणी वाढत होत आहे. त्यामुळे या उत्पादनांची निर्यात वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे डाबर इंडियाचे व्यवस्थापक दिनेश कुमार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, याची कल्पना सरकारलाही आली असून सरकारने यासाठी पोषक वातावरण तयार केले आहे. त्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या कामकाजाच्या पद्धतीत आवश्‍यक बदल केले जात आहेत. आयुर्वेदाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता काही मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या या क्षेत्रात संशोधन आणि विकास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचा या क्षेत्राला आणि भारतातून होणाऱ्या निर्यातीला फायदा होण्याची शक्‍यता आहे. ते म्हणाले की, बालकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, बालकांच्या आरोग्यास सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने डाबरने जागृती कार्यक्रम सुरू केला आहे. या मोहिमेखाली डाबरने 12 शहरातील एनजीओसह हातमिळवणी केली आहे. त्याला शाळांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)