दुचाकीच्या विक्रीत 10 टक्‍क्‍यांनी टक्‍क्‍यांची वाढ शक्‍य

File pic

नवी दिल्ली -आगामी वित्त वर्षात दुचाकीच्या विक्रीत 10 टक्‍क्‍यापर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. ही वाढ आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये नोंदवली जाणार असल्याचे इक्राच्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे.

सततच्या वाढत जाणाऱ्या वाहनांच्या खरेदीमध्ये ग्रामीण टक्का वधारणार असल्याचा अंदाज मांडण्यात येत आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या उत्पादनात होत असणारी वाढ हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रातील बदल व ग्रामीण विभागात होत असणारी उत्पन्नात वाढ आणि लहान उद्योगात होणारी वृद्धी यामुळे येणाऱ्या काळात मोठी वाढ ही वाहनाच्या विक्रीत होणार असल्याचे अनुमान इक्राया मूल्यमापन करणाऱ्या संस्थेकडून नोंदवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)