नवी दिल्ली – देशांतर्गत दागिने उत्पादकांनी खरेदी वाढविल्यामुळे सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली मात्र औद्योगिक क्षेत्राकडून मागणी कमी असल्यामुळे चांदीच्या दरात 500 रुपयांची घट झाली.
दिल्ली सराफत शुद्ध सोन्याचे दर 110 रुपयांनी कमी होऊन ते 33,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर स्टॅंडर्ड सोन्याचे दर 110 रुपयांनी कमी होऊन 33,560 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर 500 रुपयांनी कमी होऊन 37,850 रुपये प्रति किलो झाला.