इलेक्‍ट्रिक वाहनांच्या निर्मितीची आवश्‍यकता

देशातच बॅटऱ्यांचे उत्पादन होणे गरजेचे : अरुण फिरोदिया

पुणे – पेट्रोलचे साठे कमी होत असून, प्रदुषणमुक्‍त वाहतुकीसाठी इलेक्‍ट्रिकल वाहने हाच योग्य पर्याय आहे. त्यामुळे 15 वर्षे पूर्ण झालेली वाहने मोडीत न काढता त्याचे रूपांतर इलेक्‍ट्रिकल वाहनांमध्ये केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे मत कायनेटीक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी व्यक्‍त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भविष्यकाळातील सुरक्षित व प्रदूषणमुक्त वाहने आणि स्मार्ट शहरांसाठीची पर्यावरणपूरक वाहने या संकल्पनेवर गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित 18 व्या “पुणे ऑटो एक्‍स्पो’चे उद्‌घाटन फिरोदिया यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संयोजक पी. एन. आर. राजन, किशोर पिंगळीकर, पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, सीआयआरटीचे डॉ. राजकुमार, एआयआरआयएचे अध्यक्ष प्रशांत वाणी, आयआयएमएमचे अध्यक्ष अमित बोरकर उपस्थित होते.

राष्ट्राच्या प्रगतीमध्ये वाहन उद्योगांचा मोठा वाटा आहे असे सांगत फिरोदिया म्हणाले, इलेक्‍ट्रिकल वाहनांमुळे किंमतीत घट होऊन प्रदूषण कमी होण्यास निश्‍चितच मदत होईल. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांसाठी बॅटरी चार्जींग स्टेशन उभारणे, देशातच बॅटरीचे उत्पादन करणे यामुळे नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध होतील. जगातील इतर देशही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. त्यामुळे आपण या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकाबरोबरच खासगी क्षेत्रानेही या क्षेत्रात काम करणयाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यःस्थितीत नवीन वाहने खरेदी करणे सोपे नाही. त्यामुळे जुन्या वाहनांचे इलेक्‍ट्रॉनिक वाहनांमध्ये रूपांतरण सोयीस्कर ठरणार आहे. नव्या वाहनांचे इंजीन अद्ययावत असल्याने प्रदूषण होत नाही. त्यामुळे जुनी वाहने मोडीत काढली जातात. त्याऐवजी या वाहनांचे मोटार, गिअर बॉक्‍स आणि कंट्रोल बदलून ई-वाहनांमध्ये रूपांतर करावे. त्यामुळे पीएमपीच्या कालबाह्य झालेल्या एक हजार बसेस ई-बसमध्ये बदलता येतील. देखभाल-दुरुस्ती खर्च, ब्रेकडाऊनचा प्रश्‍न उद्‌भवणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)