कर्ज परतफेडीचा हप्ता चुकला

File photo

जेट एअरवेजचा शेअर कोसळला; मुख्य निर्देशांकांतही घट

मुंबई – जेट एअरवेजने बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा हप्ता चुकविला असल्यामुळे आज या कंपनीच्या शेअरच्या भावात 5 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली. हा हप्ता 31 डिसेंबरला देणे अपेक्षित होते. मात्र कमी महसुलामुळे ते शक्‍य झाले नसल्याचे कंपनीने शेअरबाजारांना कळविल्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना उशिरा वेतन मिळत आहे. त्याचबरोबर इतरही अनेक अडचणी असल्यामुळे कंपनी स्टेट बॅंकेकडून 1500 कोटी रुपयांचे खेळते भांडवल मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. या घटनाक्रमानंतर इक्रा संस्थेने या कंपनीचे पतमानांकन कमी केले आहे.
मुख्य निर्देशांकांतही मोठी घट

सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत चीनचा विकासदर केवळ 6.5 टक्‍के इतका मोजला गेला आहे. या कारणामुळे जागतिक बाजारातील जोरदार विक्रीमुळे भारतीय शेअरबाजारातही जोरदार विक्री होऊन निर्देशांक कोसळले. बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1 टक्‍क्‍यांनी म्हणजे 363 अंकांनी कमी होऊन 35891 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 117 अंकांनी कमी होऊन 10792 अंकांवर बंद झाला. जागतिक घटनाक्रमामुळे रुपयाच्या मूल्यातही मोठी घट नोंदली गेली.

जागतिक शेअरबाजारात सुट्यांचा काळ असल्यामुळे आणि व्यापारयुद्धामुळे मंदीचा काळ कायम चालू आहे. या कारणामुळे क्रुडचे दर आज सव्वाटक्‍क्‍यांनी कमी होऊन 53.12 डॉलर प्रति पिंपावर आले. या घटनाक्रमाचा रुपयाचा मूल्यावर नकारात्मक परिणाम झाला. आज रुपयाचे मूल्य तब्बल 63 पैशांनी घसरून रुपयाचा दर प्रति डॉलरला 70.06 रुपये इतका झाला. आज झालेल्या विक्रीचा फटका वाहन, धातू क्षेत्रांतील कंपन्यांना जास्त बसल्याचे दिसून आले. काल परदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांनी मोठी विक्री केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)