जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न

कंपनी बंद पडल्यास 23 हजार नोकऱ्यांवर परिणाम

नवी दिल्ली, दि. 19-संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचा खेळत्या भांडवलाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या एके काळच्या आघाडीच्या कंपनीची अर्धी भागीदारी फक्‍त 1 रुपयात विकत घेण्याचा तांत्रिक निर्णय कंपनीला कर्ज देणाऱ्या भारतीय स्टेट बॅंकेने घेतला असल्याचे बोलले जाते. हा करार कंपनीला देण्यात आलेल्या कर्जाची पुनर्रचना करण्याच्या हेतूने करण्याचा बॅंकेचा विचार आहे. त्यामुळे जेट एअरवेजला भांडवल उभारणी करण्यास मदत मिळणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या नियमावलीनुसारच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंधनावरील कर आणि प्रवाशांकडून प्रीमियम चुकते न करण्यात दाखवलेला अनुत्साह यामुळे कंपनीच्या नफा कमी होऊ लागला. बजेट ऑपरेटर्सच्या तुलनेत जेट एअरवेजने प्रवाशांना अनेक महत्त्वाच्या सुविधा जवळजवळ मोफतच उपलब्ध केल्या. याच कारणांमुळे कंपनी कर्जाच्या चक्रात फसत गेली. जेट एअरवेज नरेश गोयल यांनी स्थापन केली होती. याच कंपनीने 1990च्या दशकात विमान वाहतूक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांची मक्‍तेदारी संपवली होती. सध्याच्या घडीला जेट एअरवेजमध्ये आबुधाबीतील एतिहाद एअरवेज या कंपनीची 24 टक्‍के इतकी भागीदारी आहे.

जेट एअरवेज कंपनी सुरू राहणे हे सरकारच्या दृष्टीनेदेखील गरजेचे आहे. कंपनी बंद पडून रोजगार गेल्यास रोजगार निर्मितीत विशेष कामगिरी न करू शकलेल्या सरकारला आरोपांचे धनी व्हावे लागू शकते. जेट एअरवेजने 23,000 लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. कंपनी बंद पडल्यास रोजगाराच्या दृष्टीने ते एक संकटच ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)