दागिने व रत्न क्षेत्राच्या नियमनासाठी परिषदेची निर्मिती

मुंबई – रत्ने आणि दागिने व्यवसायासाठीच्या देशांतर्गत परिषदेचे केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या परिषदेच्या कामाची सुरुवात 1 मेपासून होणार असून या परिषदेमुळे या क्षेत्रातील सर्व समस्या सोडवल्या जाऊ शकतील. केंद्र सरकार लवकरच एकात्मिक सुवर्ण धोरण आणणार आहे. सोन्याला भारतात मोठी परंपरा असून आज सोने आणि सोन्यांच्या दागिन्यांचा व्यवसाय वाढवण्याची गरज आहे. या क्षेत्राला उभारी दिल्यास कुशल कामगारांना रोजगार मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतातून सोन्याच्या दागिन्यांची निर्यात सुमारे दोन अब्ज डॉलर्स इतकी आहे मात्र सोन्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध असून निर्यात वाढवण्यासाठी ही बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जगभरातल्या कंपन्यांना भारतात आमंत्रित केले जाणार असून या कंपन्या भारतीय उत्पादने विकत घेण्याविषयी धोरण ठरवू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)