अभियांत्रिकी क्षेत्रात आगामी काळात रोजगारांच्या संधी वाढणार

नवी दिल्ली – भारतासाठी येणारे नवीन वर्ष अनेक कारणांसाठी नवीन बदल घेऊन येणार असल्याचे ठरणार आहे. यात लोकसभा निवडणूक, आर्थिक धोरणात करण्यात येणारे बदल, नवरोजगारांची निर्मिती आणि जुन्यांना उभारी असे अनेक बदल होणार असल्याचे संकेत बाजारापेठामधून मिळत असल्याची नोंद करण्यात येत आहे.

सध्या भारतात कार्यरत असणाऱ्या अनेक कंपन्या नवीन वर्षात अभियांत्रिकी शिक्षणावर आधारीत रोजगार निर्मिती करणार असल्याची या क्षेत्रांतून माहिती देण्यात आली आहे.

सदर माहितीच्या आधारे देशात पायाभूत सुविधा, रिटेल व्यवसाय, ऑटोमोबाईल क्षेत्र आणि वित्तीय सेवाच्या संदर्भात संबंधीत असणाऱया क्षेत्रांमध्ये नवीन रोजगारांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यातल्या त्यात अभियंत्रीकी क्षेत्र आघाडीवर राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)