परकीय चलन साठ्यात वाढ

नवी दिल्ली – भारताच्या विदेशी चलन साठयात उत्तरोत्तर वाढ होत असून आता तो 396.084 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. रिझर्व्ह बॅंकेने ही माहिती दिली. त्यामुळे जागतिक चलन बाजारातील अस्थिरतेचा भारतावर कसलाही परिणाम होणार नसल्याचे समजले जाते.

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवडयात चलनसाठयात 11.64 कोटी डॉलर्सची भर पडली. एप्रिलमध्ये हा साठा 408 अब्ज डॉलर्सच्या पातळीवर पोहचला होता. नंतर कच्च्या इंधन तेलाचे दर वाढल्याने त्यात घट झाली. आता तो पुन्हा वाढू लागला आहे. रुपयाच्या किमतीचाही परिणाम विदेशी चलनसाठय़ावर होत असून आता स्थिती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)