विकासदर वाढविण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रयत्न करणार – सुरेश प्रभू

संग्रहित छायाचित्र...

मुंबई – भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढावी याकरीता जिल्हा स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे.

विविध बाजारांच्या सदस्यांनी आयोजीत केलेल्या एका परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, यासाठी देशातील सहा जिल्हे निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांचा विकास दर 2 ते 3 टक्‍क्‍यांनी वाढविणचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील मोठया व्यावसाईक संस्थांची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होण्याची शक्‍यता आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याचा इतर जिल्ह्यातही उयोग करण्याची शक्‍यता खुली ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की, या जिल्याची स्थूल अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयोग केला जाणार आहे. त्यामुळे या जिल्यांचा दीर्घपल्ल्यात विकास दर वाढण्याच्या शक्‍यता खुल्या होणार असल्याचा दावा त्यांनी केला. सध्या भारतीची अर्थव्यवस्था केवळ 2.6 लाख कोटी डॉलरची आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या पाहता त्यामुळे भारतातील दरडोई उत्न्न फारच कमी आहे.

दरडोई उत्पन्न वाढल्याशिवाय भारतीाल लाकांच्या जगण्याचा दर्जा सुधारणार नाही. त्यामुळे 9 वर्षात अर्थव्यवस्था 5 अब्ज डॉलर आणि 2035 पर्यंत 10 अब्ज डॉलरची करण्याचे उद्दिष्ठ ठरविण्यात आले असल्याचे त्यानी सांगितले. ही बाब निर्यात वाढविल्याशिवाय शक्‍य होणार नाही. जागतिक मंद वातावरणामुळे गेल्या काही वर्षात प्रयत्न करूनही निर्यात वाढलेली नाही. त्यामुळे आता भारताने सेवांची निर्यात वाढविण्याच्या शक्‍यतेवरही लक्ष देण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)