कर्जवितरण गेल्यावर्षाच्या पातळीवर कायम

मुंबई – सप्टेंबर 2018 च्या तिमाहीमध्ये व्यावसायिक कर्जवितरणाचा दर गेल्यावर्षीच्या तुलनेत 13.5 टक्‍क्‍यांवर कायम राहिला आहे. सप्टेंबर अखेर वितरीत केले गेलेले एकूण कर्ज 105.5 लाख कोटी रुपयांचे असून त्यात एमएसएमई उद्योगांचा वाटा 24.7 लाख कोटी इतका आहे.

व्यावसायिक कर्जवितरणाच्या आघाडीवर सर्वसाधारण ढोबळ एनपीए दर सप्टेंबर 18 मध्ये 17.5% होता. हाच दर सप्टेंबर 17 मध्ये 15.5% इतका होता. व्यावसायिक पातळीवर एकूण एनपीएचे प्रमाण सप्टेंबर 17 च्या तुलनेत सप्टेंबर 18 मध्ये 2.23 लाख कोटी रुपयांनी वाढले. ही माहीती ट्रान्सयुनियन सिबिल-सिडबी एमएमएमई पल्स अहवालात देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिडबीचे अध्यक्ष मोहम्मद मुस्तफा म्हणाले, कर्जपुरवठादारांच्या दृष्टीने एमएसएमई उद्योग हे फायदेशीर ठरत असून हे क्षेत्र व्यवसायवृद्धी आणि चांगल्या परताव्याची हमी देणारे आहेत.

सप्टेंबर 15 ते सप्टेंबर 18 या कालावधीमध्ये 60 दिवसांत वेगवेगळ्या कर्जपुरवठादारांकडून वेगवेगळी कर्जे घेणाऱ्या कर्जदारांकडून कर्जे थकवली जाण्याचे प्रमाण 2.5 % वरून 4.4% वर गेली आहेत. याचा अर्थ कर्जदार कर्जावर कर्जे घेत राहिल्यास ती एनपीएमध्ये रूपांतरित होण्याची शक्‍यता जास्त आहे. बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्या अर्थात एनबीएफ सी कंपन्यांनी मंजूर केलेल्या कर्जांच्या बाबतीत हा प्रकार प्रामुख्याने निदर्शनास आला आहे असे ते म्हणाले.

ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पिल्लई म्हणाले, कर्जावर कर्ज घेणाऱ्या कर्जदारांकडून कर्जे थकवली जाण्याचा धोका गेल्या तीन वर्षांमध्ये वाढला आहे. पोर्टफोलियोंवर नियमितपणे देखरेख ठेवल्यास कर्जपुरवठादाराला अशा गोष्टींची वेळीच सूचना मिळू शकेल व कर्ज बुडणे व नुकसान रोखण्यासाठी वेळीच हस्तक्षेप करता येईल असे ते म्हणाले.
100 कोटी रुपये व त्याहून मोठा एमएसएमई पोर्टफोलियो असलेल्या एकूण 128 कर्जपुरवठादार संस्था आहेत. यापैकी 77 एनबीएफसी गटात मोडणाऱ्या संस्था असून एप्रिल 18 ते सप्टें. 18च्या दरम्यान नव्या कर्जांना मजूंरी देण्याच्या बाबतीत बाजारातील एकूण 17% वाटा या सर्वांचा आहे. एनबीएफसींकडून होणाऱ्या वित्तपुरवठ्यावर सर्वाधिक प्रमाणात अवलंबून असलेल्या क्षेत्रांमध्ये वाहतूक आणि दळणवळण, स्थावर मालमत्ता, शिक्षण, आरोग्य, खाण आणि बांधकाम या क्षेत्रांचा समावेश असल्याचे दिसून येते.

“चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत कर्जवितरणात घट झालेली नाही. ही समाधानाची बाब आहे. मात्र एनपीएत काही अंशी वाढ होत आहे. हा प्रकार कर्जावर कर्ज घेतलेल्या थकबाकीदारांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या खात्याकडे कर्ज पुरवठादारांनी लक्ष ठेवून वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
-सतीश पिल्लई ,व्यवस्थापकीय संचालक, ट्रान्स युनियन सिबील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)