टीसीएस कंपनीच्या नफ्यात वाढ

नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक केल्याचा फायदा

मुंबई – भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार असलेली कंपनी टीसीएसने आपला तिसऱ्या तिमाहीचा ताळेबंद आज जाहीर केला त्यानुसार या तिमाहीत कंपनीचा नफा 24.1 टक्‍क्‍यांनी वाढून 8105 कोटी रुपये इतका झाला आहे. त्यामुळे इतर कंपन्यांच्या महसुलात आणि नफ्यात वाढ होण्याची शक्‍यता वाढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 6531 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. या तिमाहीत कंपनीचा महसूल 20 टक्‍क्‍यानी वाढून 37338 कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीने सांगितले की आमच्याकडे पुरेशा ऑर्डर आहेत. त्याचबरोबर आगामी काळातही काम वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे पुढील तिमाहीतही उलाढाल आणि नफा वाढण्याची शक्‍यता आहे. आम्ही गेल्या काही वर्षापासून नव्या तंत्रज्ञानात करीत असलेल्या गुंतवणुकीमुळे आम्हाला नव्या तंत्रज्ञानावर आधारित काम मिळत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रुपयाच्या मूल्यावर बराच परिणाम झाला असला तरी त्याचा कंपनीच्या ताळेबंदावर फारसा परिणाम झाला नाही. आता रुपयाचे मूल्य स्थिर होत असल्यामुळे कंपनीची कामगिरी आणखी सुधारेल. तसेच त्या विषयाकडे कंपनीला फारसे लक्ष द्यावे लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने आता 3 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. या तिमाहीत कंपनीच्या कामगाराच्या संख्येत वाढ होऊन आता कंपनीत 417929 इतके कर्मचारी काम करीत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीला अमेरिकेबरोबर युरोपातील काही देशातून बऱ्याच मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)