मारुती सुझुुकी कंपनीकडून 10 हजार रुपयांपर्यंत दरवाढ

चलन अस्थिरता व कच्चा माल महागल्याचे कारण

नवी दिल्ली – मारुती सुझुकी कंपनीने आपल्या काही कारच्या दरात 10 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार ही दरवाढ लगेच लागू करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर परकीय चलनातील अस्थिरतेमुळे कंपनीला सुट्या भागाची आयात महागात पडत आहे. त्यामुळे कंपनीला दर वाढ करावी लागत आहे.

कंपनीने शेअरबाजाराला दिलेल्या माहितीनुसार काही मॉडेलच्या दरात 10 जानेवारीपासून 10 हजार रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र कोणत्या मॉडेलच्या दरात वाढ केली आहे, हे कंपनीने सांगितलेले नाही. कंपनीने ही माहिती जारी केल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली होती. या अगोदर बऱ्याच कार कंपन्यांनी आपल्या विविध मॉडेलच्या दरात वाढ केली आहे. आगामी काळातही काही कंपन्या दरवाढ करण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)