स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढावे

राज्य सरकारकडे उपाययोजना सुचविणार – व्ही.गिरीराज

रत्नागिरी – जिल्हा परिषद व नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी वित्त आयोगाच्या अहवालात विविध उपाययोजना सुचविण्यावर भर राहिल, असे प्रतिपादन पाचव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज यांनी येथे केले. व्ही गिरीराज यांनी रत्नागिरीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली व त्यांचे प्रश्न व मागण्या जाणून घेतल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोठ्या नगरपालिकांना भांडवली वाढीसाठीच्या उपाययोजना; गुजरात, केरळ राज्यात व्यवसाय कर, स्थानिक स्वराज्य संस्थाकडून वसूल होतो अशा नवनविन उपाययोजना सूचविणार असल्याचे स्पष्ट करून व्ही. गिरीराज म्हणाले की, याबाबत आयोगाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आहे.

हा आयोग पाच सदस्यीय असून कायमस्वरुपी व ठोस उपाययोजना सूचविण्यावर आयोगाचा भर राहणार आहे. नगरपालिकांचा जास्तीत जास्त खर्च पिण्याच्या पाणी योजनांवर होत असतो या बाबतही काय करता येईल याचाही विचार सुरु आहे. क वर्ग नगरपालिकांचा विकास आराखडा, शहरात उद्याने व बागा, कंपोष्ट डेपो आदि बाबींसाठी व भूसंपादनासाठी नगरपालिकांना अनुदान मिळावे यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचे आयोगाच्या विचाराधिन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)