उडान योजनेअंतर्गत परदेशातही सेवा मिळणार

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या उडान या महत्त्वाकांक्षी योजनेचा लवकरच आंतरराष्ट्रीय विस्तार होणार असून याचा पहिला मान आसाम सरकारला मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, देशांतर्गत उडान सेवेचा विस्तार करण्यासाठी तिसरी निविदा प्रक्रिया सुरू केली असून 15 विमान कंपन्यांची 111 नव्या मार्गासाठी निविदा सादर करण्यात आली आहे. यात स्पाईस जेटने 37 तर इंडिगोने 20 मार्गांचे अर्ज सादर केले आहेत. या योजनेंतर्गत गुवाहाटी-बॅंकॉक आणि गुवाहाटी-ढाका अशी आंतराष्ट्रीय सेवा सुरू करण्यासाठीची निविदा प्रक्रिया तयार केली असून केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाच्या मंजुरीनंतर सेवेची घोषणा होईल, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुवाहाटी-बॅंकॉक आणि गुवाहाटी-ढाका या सेवेसाठी आसाम सरकारकडून काही आसनांसाठी अनुक्रमे 4,400 आणि 2,370 रुपयांचे अनुदान देण्याची तयारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)