व्यापारयुद्धामुळे जागतिक विकासदर कमी होणार

वॉशिंग्टन – जागतिक व्यापारयुद्धामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेचा यंदाचा विकासदर अंदाज घटवून बॅंकेने 2.9 टक्के केला आहे. गेल्या वर्षी हाच दर 3 टक्के होता. बॅंकेने जागतिक अर्थव्यवस्थेचे अनुमान हा अहवाल जारी केला.

त्याप्रसंगी जागतिक बॅंकेच्या अधिकाऱ्यानी सांगितले की, जागतिक वृद्धीची गती मंदावत असून, जोखीम वाढत चालली आहे.
एकूण जागतिक व्यापार आणि होणारे वस्तूंचे उत्पादन यात मोठी घसरण दिसून येत आहे. जागतिक स्तरावर व्यापारी संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.

विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय दबाव दिसून येत आहे. जागतिक बॅंकेने म्हटले की, यंदा विकसित अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर घसरून 2 टक्‍क्‍यांवर येणार आहे. उगवत्या बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांवर अनेक घटक प्रतिकूल परिणाम करीत आहेत. अहवालानुसार 2018 मध्ये 3 टक्के असलेला वृद्धीदर अंदाज 2019 साठी 2.9 टक्के केला आहे. बाह्य मागणीतील घसरण, उसनवाऱ्यांचा वाढता खर्च आणि धोरणांतील अनिश्चितता यांचा त्यात समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)