बचत दर वाढण्याची गरज

-प्राप्तिकर उत्पन्न मर्यादा 5 लाख रुपये करावी

-कंपनी कर 25 टक्‍के करण्याची सीआयआयची मागणी

नवी दिल्ली – बचत दर वाढण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात प्राप्तिकर उत्पन्न मर्यादा दुप्पट करण्याच्या शक्‍यतेवर गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे भारतीय उद्योग महासंघाने म्हटले आहे.

1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकार आपला अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहे. त्यानंतर नवीन सरकार आपला पूर्ण अर्थसंकल्प मांडील. त्याचबरोबर भारतात कमाल प्राप्तिकर 30 टक्‍के आहे. तो 25 टक्‍क्‍यापर्यंत कमी करण्याची गरज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीआयआयने सांगितले की प्रत्येक सरकार प्राप्तिकर उत्पन्न मर्यादा वाढविली जाईल असे सूचित करते. मात्र ऐन अर्थसंकल्पात ती मर्यादा कायम राहते. त्यामुळे जनतेच्या बचतीवर नकारात्मक परिणाम होत आहे. जगातील इतर वेगाने विकसित होणाऱ्या देशांतील उत्पन्न मर्यादेपेक्षा भारतातील उत्पन्न मर्यादा जास्त आहे.

भारतातील कंपनी करही बराच जास्त आहे. तो 25 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असू नये. तसेच तो हळूहळू 18 टक्‍के करण्याची गरज आहे. वेगाने विकसित होणारे देश आणि विकसित देशांपेक्षा भारतातील प्राप्तिकर आणि कंपनी कराचे दर जास्त आहे. त्यामुळे कर भरणा करण्यास लोक पुढाकार घेत नाही. या कराचे दर जागतिक पातळीइतके असावे याबाबत गेल्या 20 वर्षांपासून चर्चा असूनही याबाबत निर्णय होत नसल्याबद्दल महासंघाने असमाधान व्यक्‍त केले आहे.

1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळेल. यामुळे बचतीचा दर वाढून गुंतवणूक वाढण्यास चालना मिळेल असे महासंघाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)