जनधनमध्ये किमान रकमेची मर्यादा नाही

नवी दिल्ली – प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्याबद्दल दंड आकारला जात नाही. केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शुक्‍ला यांनी ही माहिती दिली.

बॅंकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 26 डिसेंबर 2028 पर्यंत 33.66 कोटी बॅंक खाती आहेत यापैकी 28.16 कोटी खाती कार्यरत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संबंधित खातेधाराने विनंती केल्यास बॅंक खाते बंद करण्यात येते. रिझर्व्ह बॅंकेच्या पत्रकानुसार केवायसी निकषांची पूर्तता न करणाऱ्या अथवा त्या संदर्भात माहिती न देणाऱ्या खातेदाराला नोटीस दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने खाते बंद करण्याची परवानगी बॅंकांना आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)