28 जानेवारीपासून महाराष्ट्र सरकारचा स्टार्टअप्‌ सप्ताह

योग्य स्टार्टअपला मिळणार मार्गदर्शन व भांडवल

मुंबई – महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीद्वारे येत्या 28 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र स्टार्टअप्‌ सप्ताह मुंबईत आयोजित केला जात आहे. यामध्ये राज्यातील विविध स्टार्टअप्स्‌ना आपल्या अभिनव संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य सरकारच्या या उपक्रमात आपली संकल्पना सादर करण्यासाठी प्रत्येक स्टार्टअप्‌ अर्ज करू शकतो. त्यापैकी निवड झालेल्या शंभर अभिनव संकल्पना स्टार्टअप्स्‌ना उद्योग जगतातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडता येतील. शिवाय यांच्यातील पहिल्या 24 स्टार्टअप्स्‌ना 15 लाख रुपयांची कामेही सरकारकडून देण्यात येणार आहेत.

शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, सर्वसमावेशक आर्थिक विकास आदी क्षेत्रातील स्टार्टअप्स्‌ना विशेष प्राधान्य देण्यात येईल. या सप्ताहात विविध प्रदर्शने, कार्यशाळा, व्हेंचर कॅपिटालिस्टना भेटण्याची संधी, चर्चा, नेटवर्किंग इव्हेंट्‌स, व्याख्यानामाला आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)