विकासदर 7.2 टक्‍के राहण्याची सरकारला अपेक्षा

नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षात कृषी आणि मॅन्युफॅक्‍चिरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढणार असल्यामुळे विकासदर 7.2 टक्‍क्‍यांवर जाईल असे केंद्रीय सांख्यिकी विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षी हा विकास दर 6.7 टक्‍के इतका होता.
रिझर्व्ह बॅंकेने या वर्षाचा विकासदर 7.4 टक्‍के इतका राहील, अशी शक्‍यता या अगोदर जाहीर केलेल्या पतधोरणावेळी व्यक्त केली आहे.

शेती क्षेत्राची उत्पादकता या वर्षी 3.8 टक्‍के इतकी होणार असल्यामुळे याचा आकडेवारीवर सकारात्मक परिणाम जणवत आहे. त्याचबरोबर भांडवल पुरवठा वाढत असल्यामुळे इतर क्षेत्रांची उत्पादकता वाढण्यासाही मदत होणार असल्याचे या विभागाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोटाबंदी आणि जीएसटीजा सर्व क्षेत्रावर गेल्या दोन वर्षांपासून काही प्रमाणात परिणाम झाला होता. मात्र, आता तो परिणमा संपुष्टात आला असल्यामुळे आगामी काळात विकासदर वाढणार असल्याचे या विभागाला वाटते. आंरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बॅंकेनेही या अगोदरच विकासदर वाढणार असल्याचे सांगितले आहे. या बाबीकडे विभागाने लक्ष वेधले आहे. विकासदर वाढल्यानंतर त्या प्रमाणात कर संकलनातही वाढ होणार आहे. त्यामुळे तूट कमी होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)