कंपनी लवाद यंत्रणा कमालीची यशस्वी

कर्ज वितरणासंबंधात बॅंका आणि कंपन्यांतील संबंध अधिक जबाबदारीचे झाले

नवी दिल्ली – राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद यंत्रणा कमालीची यशस्वी झाली आहे. त्यामुळे कंपन्या आता बेजबाबदारपणे कर्ज घेऊ शकणार नाहीत. त्याचबरोबर बॅंका बेजबाबदारपणे कर्ज घेणाऱ्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. लवादामुळे (एनसीएलटी) 66 प्रकरणांत 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. आणखी 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज मार्च अखेरपर्यंत वसूल होईल, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नादारी व दिवाळखोरी संहितेची दोन वर्षे या शीर्षकाची एक पोस्ट जेटली यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, व्यावसायिक नादारीच्या समस्येवर कॉंग्रेसने काहीही उपाय योजलेले नव्हते. रालोआ सरकारने झटपट हालचाली करून नादारी व दिवाळखोरी संहिता कायदेशीर केली. 2016 च्या अखेरीस एनसीएलटीकडे औद्योगिक दिवाळखोरीची प्रकरणे यायला सुरुवात झाली.

आतापर्यंत 1,322 प्रकरणे लवादाला प्राप्त झाली आहेत. 4,452 प्रकरणांत दाखल होण्यापूर्वीच तडजोड झाली आहे. 66 प्रकरणे रितसर खटला चालवून निकाली निघाली आहेत. 260 प्रकरणांत पुढील कारवाईचा आदेश देण्यात आला आहे.
जेटली यांनी लिहिले की, 66 प्रकरणांतून कर्जदात्यांचे 80 हजार कोटी रुपये वसूल झाले आहेत. याशिवाय भूषण पॉवर अँड स्टील तसेच एस्सार स्टील इंडिया यांसारखी 12 मोठी प्रकरणे निकाली निघण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. याच वित्त वर्षात ही प्रकरणे निकाली निघू शकतील.

त्यातून आणखी 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज वसूल होईल. जेटली यांनी आनल्या या पोस्टमध्ये म्हटले की, ज्यांनी कंपन्यांना नादारीत काढले त्यांना व्यवस्थापनातून बाहेर पडावे लागले आहे. नवे व्यवस्थापन निवडण्याची प्रक्रिया प्रामाणिक आणि पारदर्शी आहे. यात राजकीय अथवा शासकीय हस्तक्षेप झाला नाही. या सर्व घडामोडीमुळे बॅंका अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

“बॅंकांनी मंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात बड्या कंपन्यांना कर्जाचे वितरण केले. याचा गैरफायदा घेऊन काही कंपन्यांनी कर्ज परतफेडीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनुत्पादक मालमत्तेत वाढ होऊन बॅंकांच्या कर्जवितरण क्षमतेवर परिणाम झाला. कॉंग्रेसने याकडे दुर्लक्ष केले. मात्र रालोआ सरकारने राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद यंत्रणा कार्यान्वित केली.
-अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)